पुणे,दि.१५ :- झुंजार ऑनलाइन – सिंहगड रोड परिसरात आयुर्वेदिक मसाज सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर तीन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई पुणे सिंहगड रोड माणिक बाग येथील जैन मंदिरा शेजारी असलेल्या मोरया आयुर्वेदिक मसाज सेंटर येथे शुक्रवारी (दि.14) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार रेश्मा गणपत कंक यांनी फिर्याद दिली आहे
सिंहगड रस्ता परिसरातील जैन मंदिरा शेजारी असलेल्या आदर्श अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर दोनमध्ये असलेल्या मोरया आयुर्वेदिक मसाज सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन. मसाज सेंटर वर छापा टाकला. आरोपी या ठिकाणी आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. तपासात समोर आले. पोलिसांनी तीन पिडीत महिलांची सुटका केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार करीत आहेत.