पुणे ग्रामीण,दि.२४:-जुन्या मुंबई पुणे महामार्गावरुन ताजे गावाकडे जाणारा रोड मार्गे मळवली लोणावळा कडे जाणारा रोड वर गांजाची वाहतूक करणारी कार पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडली. वेरना कारमधील चौघांना अटक करुन त्यांच्याकडून ९८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/reel/C_CpY-0tsAF/?igsh=ZnB4Z2Q1bm1xeWp
अभिषेक अनिल नागवडे (वय २४), प्रदिप नारायण नामदास (वय २५), योगेश रमेश लगड (वय ३२), वैभव संजीवन चेडे (वय २३, सर्व रा. पी एम टी बस स्टॉपजवळ, कारेगाव ता. शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, माजे हद्दीतून जुन्या महामार्गाने एका वेरना कारमधून गांजा वाहतूक केली जाणार आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन पथके तयार करुन सापळा लावला. बातमीप्रमाणे वेरना कार नंबर एम.एच 14 जी वाय ताजे गावाकडे जात असल्याचे दिसताच पोलिसांनी छापा घातला. कारची व डिकीची पाहणी केली असता डिकीमध्ये ९८ किलो गांजा आढळून आला.
पोलिसांनी ४८ लाख ५० हजार रुपयांचा ९८ किलो गांजा, ४२ हजार रुपयांचे ३ मोबाईल, ८ लाख रुपयांची वेरना कार असा
५६ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त केला असून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे
, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण ,
सहायक फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदार रवींद्र रावळ, जितेंद्र दीक्षित, समीर करे, रवींद्र राय, गणेश तावरे,
प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी केली आहे