पुणे- स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी व्यवसायाचे आर्थिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नफा-तोटा, खात्यातील शिल्लक रक्कमेचा वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे. विशेषतः आर्थिक गणिताचे बॅलन्सशीट तयार करायला पाहिजे, असे मत वित्त व्यवस्थापनातील तज्ज्ञ डॉ. अनिल लांबा यांनी व्यक्त केले आहे. दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘अडॉपटेक २०२४ परिषदेत ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. यावेळी दत्त बरुआ, के. राजेंद्रन, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मारुलकर, सचिव तीर्थराज जोशी, संजय सावंत, किशोर गोरे उपस्थित होते.
डॉ. लांबा म्हणाले, कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संस्थेतील प्रत्येकाने आर्थिक व्यवस्थापन समजून घेतले पाहिजे. विक्री व उत्पान्नचा प्रभाव संस्थेतील प्रत्येकावर पडत असतो. त्यामुळे कामाची आर्थिक जाणीव कर्मचार्यांना असणे आवश्यक आहे. संस्थेची यशस्वी वाटचाली करण्यासाठी व तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता कर्मचार्यांमध्ये असते. ताळेबंद हा केवळ आर्थिक नोंदींचा दस्तवेज नसून तो व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याचा आरसा असल्याचे लांबा यांनी नमूद केले. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, प्रिंटींगमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने केला जात आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील नोकरदारांना विविध बदलांना सामोरे जावे लागत आहे. बदल काळाची नांदी असून, व्यावसायिकांनी त्याचे अवलोकन करणे फार गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहूल मारूलकर यांनी, प्रिंटींग क्षेत्रात होणारे नाविण्यपुर्ण बदल, तंत्रज्ञान, विविध संधी, संकटे, आव्हानाबाबत माहिती दिली.
प्रिंटवीक प्रसिद्ध मासिकाचे संपादक रामू रामनाथन यांनी परिषदेत जर्मनीतील ड्रुपा प्रदर्शनात भाग घेतलेल्या भारतीय मशिनरी उत्पादकांचा सहभाग, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, ड्रुपा प्रदर्शनात परदेशी मशिनरींचा मुद्रण व्यावसायिकांना होणार्या फायद्याबद्दल त्यांनी चर्चा घडवून आणली. चर्चेत दत्ता देशपांडे, सी.एन. अशोक, अमित खुराणा, पी. साजिथ, आर. बजाज, समीर पाटकर, वेणूगोपाल मेनन, ए. अप्पादुराई, मनीष गुप्ता, सहभागी झाले होते. परिषदेत प्रेरणादायी मार्गदर्शक प्रिया कुमार यांच्यासह नामांकित वक्ते एस. एन. वेंकटरमन यांनी प्रिटींग क्षेत्रातील घडामोडीसह,तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. दरम्यान, प्रिंटींग क्षेत्रात वेगाने आधुनिक बदल होत चालले आहेत. आपणही मानसिकता बदलाची आवश्यकता असून, त्याद्वारे यशप्राप्ती करता येते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रेरणादायी मार्गदर्शक प्रिया कुमार यांनी केले. तसेच परिषदेत आयटीसीचे प्रमुख आणि नामांकित वक्ते एस. एन. वेंकटरामन यांनी व्यावसायिकांना प्रिटींग क्षेत्रातील घडामोडीसह, पेपरबोर्ड आणि स्पेशालिटी पेपर्स व्यावसायाबाबत मार्गदर्शन केले.