मुंबई दि,१२ :– मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आजपासून २० मार्चपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ठरावीक वेळेसाठी रोड ब्लॉक घेण्यात येणार आहे. महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, येथील ४६.७१० ते ४६.५७९ किलोमीटर दरम्यान ढिले झालेले दरडीचे दगड काढणे प्रलंबित असल्याने खंडाळा बोगदा येथे दरडीचे दगड काढण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे १५-१५ मिनिटांचा हा ब्लॉक घेण्यात येईल.
१२ ते २० मार्चदरम्यान रोज काम करताना या मार्गावरील वाहतूक प्रत्येकी ५ वेळा १५ मिनिटे पूर्ण बंद ठेवण्यात येईल. सकाळी १० ते १०.१५, सकाळी ११ ते ११.१५, सकाळी १२ ते दुपारी १२.१५, दुपारी २ ते २.१५, दुपारी ३ ते ३.१५ यावेळी ब्लॉक घेतला जाईल. तर १५ मार्चला दुपारी ३.१५ ते १८ मार्च सकाळी १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत सुरू होईल.