पुणे, दि. १३ – भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री गिरीश बापट यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी आणि जालना लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाहिली यादी तयार केली आहे. ती येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील सात मतदारसंघांचा समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे इच्छुक होते.
भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात मतदारसंघाचा समावेश असणार आहे. पुण्यातून गिरीश बापट यांना, तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून मंत्री नितीन गडकरी आणि जालना लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.