पुणे दि,२२ : – पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उद्या (२३ मार्च रोजी) पुणे शहरात विविध संघटनांकडून साजरी केली जात आहे. त्यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील विविध मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणची वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
मुख्य मिरवणूक मार्ग – भवानी माता मंदिर, भवानी पेठ येथून रामोशी गेट चौक -नेहरी रोडने, ए. डी. कॅम्प परिसर, संत कबीर चौक, नानाचावडी चौक, अरुणा चौक, नाना पेठ चौकी, अल्पना टॉकीज, डुल्या मारुती चौक, हमजेखान चौक, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशीद चौक, सोन्या मारूती चौक, मोती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक लालमहल येथे विसर्जन होणार आहे.
नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा
१. नेहरु रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर पावर हाऊस कडून सेव्हन लव्हज चौकाकडे जाणाऱ्यांनी कादर चौक – क्वार्टर चौक, जुना मोटार स्टॅंड मार्गे जावे, किंवा पावर हाऊस चौक ते समर्थ पोलीस ठाणे ते शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट या मार्गाचा वापर करून जुना मोटर स्टॅंडकडे जावे.
२. सेव्हन लव्हज चौकातून पावर हाऊस कडे जाणाऱ्यांनी बाहुबली चौक, राजसबाई गंगाळे पथ मार्गे जुना मोटर स्टॅंड चौक, क्वार्टर गेट मार्गे जावे.
३. लक्ष्मी रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे (अलक चौक) जाणाऱ्यांनी नेहरु रोड, पावर हाऊस चौक, अपोलो टॉकीज, फडके हौद चौक, जिजामाता चौक मार्गे जावे.
४. तसेच देवजीबाबा चौकातकडून मिठा गंड चौक मार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी देवजीबाबा चौक ते दारूवाला पुल ते अपोलो सिनेमा ते पावर हाऊस चौकातून नेहरू रोडचा वापर करावा.
५. गणेश रोडवडील वाहतूक बंद केल्यानंतर जिजामाता चौकाकडे जाणाऱ्यांनी देवजीबाबा चौक, हमजेखान चौक व लक्ष्मी रोडचा वापर करावा लागेल.