मुंबई ७:- बॉलिवुड मध्ये एक काळ रुपेरी पडद्यावर आपले नाव कोरनारे अभिनेते सनी देओल यांनी अनेक चित्रपटात दमदार भूमिका केली आहे बेताब, गदर एक प्रेम कथा, इंडियन, विषत्मा, डर, घायाल,
आता आपन पाहणार आहोत ते लोकसभेत कश्या प्रकारची भूमिका बजावतात
मथुरा लोकसभेतून त्यांच्या आई हेमा मालिनी देखील निवडून आल्या आहेत
भाजपाचे गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार आणि बॉलिवूड अभिनेते सनी देओल याने बुधवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी प्रसिद्ध हृदशल्यविशारद डॉ. पांडा आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे इ. उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीआधी सनी देओलने भाजपात प्रवेश केला होता. यानंतर त्याला पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. या मतदारसंघातून आधी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना निवडून आले होते.
निवडणुकीत सनीने पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार सुनील जाखड यांना ८२,४५९ मतांनी हरवलं. सनीचा लहान भाऊ बाॅबी आणि वडील धर्मेंद्र यांनी सनीचा पंजाबमध्ये जोरदार प्रचार केला होता.
बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी