मुंबई ८ :- मुंबई शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्न बनत चालला आहे. आपल्या भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो. संपूर्ण जगात प्रतिवर्षी सुमारे १०० कोटी टन कचरा निर्माण होत असावा असा अंदाज आहे. हा सगळा कचरा एके ठिकाणी रचला तर माऊंट एव्हरेस्ट इतक्या उंचीचा पर्वत उभा राहिल.घन कचरा ढिगार्यात फेकण्यामुळे शहर आणि गावं यांचं सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची अवस्था आणि परदेशातील समुद्रकिनाऱ्यांची स्थिती यांची तुलना केली तर मुंबईबद्दल वाईट वाटते. मुंबईच्या किनाऱ्यांवरील कचरा ही समस्या आहे,
मुंबईतील अनेक रहिवाशी नाल्यांमध्ये कचरा टाकतात. त्यामुळं नाल्यांमध्ये कचरा साचून तो नाल्यांच्या पाण्यावर तरंगत प्रवाहाद्वारे समुद्रात मिसळतो. त्यानंतर हाच कचरा भरतीच्या वेळी पुन्हा किनानाऱ्यावर फेकला जातो. त्यामुळं नाल्यांमधील हा कचरा समुद्रात जाऊ नये यासाठी, पालिकेनं नाल्यांमध्ये ‘ट्रॅश ब्रूम’ ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
समुद्र स्वच्छ राहण्यास मदत
मुंबईसह पश्चिम उपनगरातील नाल्यांत ‘ट्रॅश ब्रूम’ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पूर्व उपनगरातील नाल्यांतही लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे नाल्यांसह समुद्रही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. दहिसर नाला, पोईसर नदी, इर्ला पम्पिंग स्टेशन, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन, एसएनडीटी नाला, पी अँड टी नाला, मेन अॅव्हेन्यू नाला, ओशिवरा नदी, मोगरा नाला या ठिकाणी ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे.
नाल्यांमध्ये टाकलेला कचरा हा नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे सरकत जातो. तरंगणारा कचरा नाल्याच्या प्रवाहासोबत वाहत समुद्राच्या दिशेनं जातो आणि समुद्राच्या पाण्यात मिसळतो. त्यामुळं याठिकाणी ट्रॅश ब्रूम यंत्रणा बसविण्यता आली आहे. या ट्रॅश ब्रूम यंत्रणेमुळं नाल्याच्या प्रवाहासोबत पाण्यावर तंरगणारा कचरा अडवला जाणार आहे. अडवलेला कचरा पालिकेकडून काढण्यात येणार असून त्यामुळं नालाही साफ होण्यास मदत होणार आहे
बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी