पुणे दि ८ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल हा ७७.१० टक्के लागला आहे. या निकाल ८२.८२ टक्के मुली तर ७२.७८ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.याप्रमाणे यावर्षी मुलीनीच बाजी मारली असल्याचे दिसत आहे. दरम्यान विभागीय निकाल बघितला तर यंदा कोकण विभागाने ८८.३८ टक्के निकाल लागून कोकणाने बाजी मारली आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूरचा लागला आहे.
हेही वाचा ( SSC Result 2019 : असा पाहा दहावीचा निकाल )
विभागीय निकाल
कोकण ८८.३८
कोल्हापूर ८६.५८
पुणे ८२.४८
नाशिक ७७.५८
मुंबई ७७.४0
औरंगाबाद ७५.२०
अमरावती ७१.९८
लातूर ७२.८७
नागपूर ६७.२७