पुणे दि, ८ :- पिंपरी चिंचवड व पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणार्या बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत वाहतूक पोलिसांनी नियम मोडणार्या वाहनचालकांवर पिंपरी चिंचवड व पुणे शहरात धडक कारवाई करून तब्बल लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांकडे ई चलन मशीन आल्याने वाहतूक पोलिसांना वाहनचालकांवर कारवाई करणे आगदी सोपे झाले आहे. नियम न पाळणार्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र, तरीही वाहतुकीला शिस्त लागली नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
वेगाने वाहन चालविणे, सिग्नल न पाळणे, वाहन परवाना नसणे, हेल्मेट न वापरणे, विना नंबरप्लेट वाहन चालविणार्यांवर पुणे शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई केली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल केला जातो. १ जानेवारीपासून हेल्मेट न वापरणार्या मोटारसायकलस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे. यावर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत नियम न पाळणार्या वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई पुणे शहरात काही ठिकाणी करण्यात येत असल्याचे दिसुन येते आहे त्याचबरोबर विनापरवाना वाहन चालविणे, ट्रीपल सीट वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविणार्या वाहनचालकांवर कारवाई लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक कारवाई मोटारसायकलस्वारांवर झाली आहे. तर दारू पिऊन वाहन चालविणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालविणार्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात पुणे वाहतूक शाखने तब्बल लाखो रुपयांचा दंड वसूल केला होता. सातत्याने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल केला जात असला तरी वाहनचालकांना शिस्त लागल्याचे दिसत नाही. बेशिस्तपणे वाहने चालविणार्यांची संख्या वाढतच आहे. ही चिंतेची बाब आहे.