मुंबई दि,१२ :- महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून अनेक भाविक पंढपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनास मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पंढपूरला जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी, एसटीतर्फे जादा बसगाड्या सोडण्यात येतात. यंदाही एसटी महामंडळानं आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ३ हजार ७२४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीचे सुमारे ५ हजार चालक-वाहक, व इतर कर्मचारीवर्ग येत्या १० ते १६ जुलै दरम्यान पंढरपूर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी तत्पर राहणार आहे.नियोजित ३ हजार ७२४ बसेस पैकी, नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या सुमारे १२०० आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पंढरपूरकडे येणार्या विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. जादा बस सोडण्यासाठी एसटीकडून ठिकठिकाणी तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी केली जाणार आहे. या स्थानकांवर उपहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नियोजित ३ हजार ७२४ बसेस पैकी, नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या सुमारे १२०० आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पंढरपूरकडे येणाºया विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. जादा बस सोडण्यासाठी एसटीकडून ठिकठिकाणी तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी केली जाणार आहे. या स्थानकांवर उपहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.विभागनिहाय जादा बसेसचे नियोजन
बसेस पुणे १०८० संभाजीनगर १०९७, नाशिक ६९२, अमरावती ५३३, मुंबई २१२, नागपूर ११० पंढरपूरात या काळात 3 तात्पुरती बस स्थानकं देखील उभरण्यात येणार आहेत
वारकरी दिंडीच्या माध्यमातून चालत पंढरपुरात पोहचतात मात्र परतीच्या वेळेस वाहतुकीसाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे 10% तिकिटांचं बुकिंग आगाऊ स्वरूपात मंडळाच्या ऑनलाईन बुकिंग वेबसाईटवर खुलं करण्यात आले आहे. विठाई बस देखील भाविकांसाठी सज्ज
बाळू राऊत प्रतिनिधी