मुंबई दि,१८:- (प्रतिनिधी) प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. रस्त्यांची कामे नियोजित वेळेआधी तसेच पैशांची बचत करून रस्त्यांची कामे अधिक गुणवत्ता पुर्ण व दर्जेदार करावीत अशा सुचना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम भवन येथील सभागृहात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक, मुख्य अभियंता श्रीनिवास कामत, उप सचिव रघुनाथ नागरगोजे, प्रकाश वळवी यांच्यासह राज्यातील अधिक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिल्या टप्यातील ९७ टक्के रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. ते कामे दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण झाली आहेत. हे कामे सर्वांच्या योगदानामुळे शक्य झाले असल्याचे सांगून उपस्थित अधिका-यांचे त्यांनी कौतुक केले. पुर्ण झालेल्या कामांची तपासणी वेळेत करावे. कंत्राटदारांचे पैसेही वेळेत देण्यात यावेत. मंजूर कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रक्रीयेला विलंब होणारा नाही यासाठी दक्ष रहावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
पुढील टप्यात वाढीव उदिष्ट् घेण्यात येणार आहे. तसेच कामांच्या निकषात काही बदल करण्यात येणार आहेत. संशोधनात्म्क कामांमध्ये वेस्ट् प्लास्टीकचा वापर करण्यात यावा. कामांची दर्जोन्नती, रस्ता जोड, भविष्याचा विचार करून रस्त्यांची कामे करणे, आदी विषयावर सविस्त्र चर्चा करण्यात आली. डांबरा विषयी अधिका-यांना आलेल्या समस्यांचा अवहाल तात्काळ सादर करण्याचेही निर्देश दिले. डांबराची गुणवत्ता तपासणी बाबत आणि त्यांच्यावर चलनासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. मराठवाडया्तील या येजनांतर्गत करण्यात येणारी कामे पावसाळयातही सुरू ठेवण्यात यावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ९७ टक्के काम पुर्ण
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी मार्च २०१९ पर्यंत ८ हजार ७४६ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या पैकी ८ हजार १०१ कोटी निधी वितरीत करण्यात आला. यामध्ये ७ हजार १४७ कोटी केंद्राचा हिस्सा असुन ९५४ कोटी राज्याचा हिस्सा आहे. मार्च २०१९ अखेर ८ हजार १२२ कोटी या कामांवर खर्च करण्यात आला आहे. एकुण २४ हजार ९५२ कि.मी. चे रस्ते मंजूर झाले आणि त्या पैकी २३ हजार ७४६ कि.मी. लांबीच्या रत्यांची कामे पुर्ण झाली आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्यात
१० हजार ६४८ कि.मी. लांबीचे कामे पुर्ण
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १५ जून २०१९ पर्यंत ७ हजार ३१९ कामे मंजूर करण्यात आली होती त्या पैकी १ हजार ६४८ कामे पुर्ण करण्यात आली तर २ हजार ९३७ कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर कामांची लांबी २८ हजार ९२३ की.मी. असुन त्यापैकी १० हजार ६४८ कि.मी. लांबीची कामे पुर्ण झाली आहेत. या कामांसाठी एकुण निधी १७ हजार ८०२ कोटी मंजुर करण्यात आले आहेत मे २०१९ पर्यंत या रस्त्यांच्या कामासाठी ४ हजार ९३० कोटी खर्च झाले असल्याची माहिती मंत्री मुंडे यांनी सांगितले.
बाळू राऊत प्रतिनिधी