पुणे दि,२२: – पुणे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई यांनी पासपोर्ट व्हेरिफेकशन करण्यासाठी फिर्यादी कडे ३५००/ रुपये मागणी करून तडजोडी अंती २०००/रूपये मागणी करून १,०००/-रूपये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे . १००० हजार रुपयांची लाच स्विकारताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
नागनाथ नामदेव भालेराव( पोलीस शिपाई भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन,पुणे शहर आयुक्तालय (वर्ग ३)) असे पकडण्यात आलेल्य़ा पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे.
तक्रारदार यांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून देण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई नागनाथ भालेराव यांनी ३५०० हजार रुपयांची लाच मागितली.
त्यानंतर तडजोडीअंती २ हजारांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकड़े तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यावर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला तक्रारदाराकडून १ हजार रुपये स्विकारताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या आवारात रंगेहात पकडले.
एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक प्रतिभा शेंडगे सपोआ लाप्रवि,पुणे., उदय ढवणे सपोफौ,पो.हवा.मुश्ताक खान ,पो.ना.वैभव गोसावी.
पोशि अभिजीत राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.