• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबई विद्यापीठात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस ऍन्ड कल्चरल सेंटर’ साठी ८ कोटी ५९ लाख ४७ हजार ४५५ इतक्या निधीला मंजुरी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/06/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

.मुंबई दि, २७: बाळासाहेब एक व्यंगचित्रकार होते, आणि त्यांनी त्यांच्या व्यंग चित्रातून त्यांनी आपण एक कलाकार आहोत हे जगाला दाखवुन दिले. मायकेल जॅक्सन, रजनीकांत, कपिल देव, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन असे अनेक कलावंत त्यांना भेट देत असत कारण ते कलाप्रेमी होते. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे असलेल्या सांस्कृतिक भवनात उभारण्यात येणार्या ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस ऍन्ड कल्चरल सेंटर’साठी वित्त विभागाने रुपये ८ कोटी ६० लाख इतका निधी मंजुर केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकारा मुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दिलेल्या मंजुरीमुळे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत याची घोषणा केली.
फोर्ट येथील जहांगिर आर्टस गॅलरीमध्ये प्रदर्शन भरविण्यासाठी चित्रकारांना वर्षानुवर्षे वाट पहावी लागते. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातील चित्रकारांना आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवता यावे यासाठी विद्यापीठाचे सांस्कृतिक भवनात ‘बाळासाहेब ठाकरे आर्टस गॅलरी’ उभारण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमवेत बैठका घेतल्या. जहांगिर आर्टस गॅलरीच्या धर्तीवरच परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणारी भव्य गॅलरी येथे उभारण्यात येणार आहे. कलिना येथील या सांस्कृतिक भवनात लोककला अकादमी, संगीत अकादमी, शाहीर अमरशेख अध्यासन, लोकशाहीर पठ्ठे बापुराव कलादालनही प्रस्तावित आहे. या सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्ती, नुतनीकरण, सौंदर्यीकरण, आर्टस आणि कल्चरल सेंटर स्थापित करण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीने प्रस्ताव तयार करुन तो वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली होती. त्यांनीही या कामासाठी आवश्यक रुपये ८ कोटी ५९ लाख ४७ हजार ४५५ इतक्या निधीला मंजुर दिली. त्यानुसार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना ‘मा. बाळासाहेब ठाकरे आर्टस गॅलरी’ उभारण्याबरोबरच अन्य कामांसाठीच्या आवश्यक निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती विधानसभेत दिली. या गॅलरीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य असे कलादालन उभारण्यात येणार असून चित्रकारांना प्रदर्शन भरविण्यासाठी भव्य दालन तयार करण्यात येणार असल्याची माहिती, राज्यमंत्री वायकर यांनी दिली.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेशखाडे

Next Post

सर्वांसाठी घरे २०२२’ पर्यंत मिळणार शहरी जमिनी अधिग्रहित करण्याकरिता केंद्राकडे पाठपुरावा करणार मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सर्वांसाठी घरे २०२२' पर्यंत मिळणार शहरी जमिनी अधिग्रहित करण्याकरिता केंद्राकडे पाठपुरावा करणार मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist