पुणे दि ४:- पुणे शहरात सार्वजनिक रस्ता/पदपथावर राहणाऱ्या, वाहतुकीस, रहदारीस अडथळा ठरणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी व पुणे पोलिसांनी दि ३ रोजी संयुक्तपणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हा न्यायालय, संचेती चौक, जे. एम रोड, संभाजी उद्यान या ठिकाणच्या भिक्षेकऱ्यांच्या ४ झोपड्या काढण्यात
आलेल्या आहेत. तेथील ४ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही पुणे पोलीस विभागमार्फत करण्यात येणार आहे. मा. श्री.अशोक मोराळे सो, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे शहर, मा. श्री.भानुप्रताप बर्गे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक (अतिरीक्त कार्यभार)शिल्पा चव्हाण यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक भोर,सहा.पो.फौज.झांजरे
पो.हवा.देशमुख,पो.हवा.आटोळे,म.पो.हवा स्वामी,पो.ना. जाधव,पो.ना वंजारी चालक सहा.पो. फौज.शेडगे यांनी पुणे शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नलला उभे राहुन येणारे जाणारे वाहनचालक व नागरिकांकडे भिक्षा मागुन त्यांना उपद्रव करणारे भिक्षेक-यांवर दि ०३ रोजी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण व त्यांचे पथक समर्थ व बंडगार्डन पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना अनुक्रमे के.ई.एम. हॉस्पीटलचे समोरील चौकात रोडवर एक महिला व कौन्सील हॉल पोलीस चौकीचे समोरील सिग्नल चौकात एक पुरुष असे येणारे जाणारे वाहन चालकांकडुन व नागरिकांकडुन भीक मागताना आढळून आले. त्यांना लागलीच वरील पथकाने ताब्यात घेतले व त्यांचे भिक्षा प्रतिबंधक अधिनियम कलम ४ (१) प्रमाणे कारवाई करुन भीक मागणा-या महिलेस समर्थ पोलीस स्टेशन व पुरुषास बंडगार्डन पोलीस स्टेशनचे ताब्यात देऊन कार्रवाई करण्यात आली आहे व यापुढे पुणे शहरात अस्वच्छता करणाऱ्या व भिक्षेकऱ्यांवर मनपा व पुणे पोलिस कार्रवाई करण्यात येणार आहे.