पुणे दि. ०९ :- केंद्रिय सहसचिव सुषमा तायशेटे यांनी पुरंदर तालुक्यातील पिंपळे आणि पांगारी गावांना भेट देत जलशक्ती अभियानासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधला. पांगारी गावात डोंगरावर वन विभागाकडून 25 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात येत असलेल्या 27 हजार 525 हेक्टर क्षेत्रात सुरू असलेल्या वृक्षारोपण परिसराची पाहणी केली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, जिल्हा प्रशासन अधिकारी डी. जी. लांघी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यामध्ये पांगारी या गावामधील कृषी विभागाकङून बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबांधामध्ये केलेल्या पावसाच्या पाण्याच्या साठवणूकीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. पुरंदर उपसा सिंचन योजना विभागाचे उप अभियंता रंगनाथ भुजबळ, शाखा अभियंता रामदास साळुंखे, आर.आर.माळी, निलेश लगड, उप विभागीय जलसंधारण अधिकारी डी. एम. कसबे तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.