निरा नरसिंहपूर: दि.13 :- इंदापूर तालुक्यात अद्यापी पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतीसाठी निरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातुन तातडीने पाणी द्यावे,अशी मागणी इंदापूर तालुका काॅग्रेस कमिटीच्या वतीने काल शुक्रवारी दि.12 रोजी इंदापूरच्या तहसिलदार सोनाली मेटकरी यांचेकडे निवेदनादारे करण्यात आलेे आहे.तसेच तालुक्यातील सर्व तलावांमध्ये पाणी सोडण्यात यावे,पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात यावेत आदी मागण्यांही शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल सी.विद्यासागरराव,मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींना पाठविण्यात आल्या आहेत. इंदापूर तालुक्याच्या हक्काचे पाणी गेल्या साडे चार वर्षांत इंदापूर तालुक्याला मिळाले नाही. सध्या तालुक्यात पिण्याचे पाणी तसेच जनावरांना चारा टंचाई जाणवत असून शेतातील पिके जळून गेल्याने तालुक्यात शेतीसाठी पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. खडकवासला धरण व निरा खो-यातील भाटघर आणि इतर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने इंदापूर तालुक्यामध्ये पिणेसाठी पाणी व चारा पिके आणि शेतातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन देण्यात यावे,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच खडकवासला कालव्यातून लाभक्षेञातील तरंगवाडी, पोंदकुलवाडी, बिजवडी, कौंठळी,न्हावी, रूई, पळसदेव,काळेवाडी,डाळज, कळस,भादलवाडी,पोंधवडी, मदनवाडी, अकोले,निरगुडे, शेटफळ गढे, म्हसोबावाडी येथील पाझर तलाव भरून घेण्यात यावेत.तर निरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली,अंथुर्णे, वरकुटे खुर्द,वडापुरी, वाघाळा या तलावांमध्ये तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सदरच्या निवेदनात मुंबई( मालाड), कोंढवा-पुणे येथिल भिंत पडून झालेली दुर्घटना तसेच कोकणातील तिवरे धरण दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी,शासनाने शेतक-यांना पिक कर्ज वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्या काॅग्रेस पक्षाच्या वतीने शासनाकडे निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. यांना निवेदन देताना तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव,इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील,विलासराव वाघमोडे, मंगेश पाटील,बापू जामदार ,धनंजय पाटील,महेंद्र रेडके, हनुमंत बनसोडे,निवृत्ती गायकवाड, कैलास कदम, तुळशिराम चोरमले,सुभाष काळे,मच्छींद्र अभंग, मेघ:शाम पाटील,रघुनाथ राऊत, पिंटू काळे,गोरख शिंदे, वैभव गोळे,प्रवीण देवकर, बाळासाहेब शिंदे तसेच काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब सुतार :- निरा प्रतिनिधी