पुणे, दि. १५ : –पुणे शहरात विनापरवाना देशी व विदेशी दारुची विक्री करणा-या दुकानावर छापा पुणे गुन्हे शाखा, युनिट- ४ या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अब्दुल सय्यद, पोलीस कर्मचारी सुरेंद्र साबळे, रमेश राठोड, रमेश चौधर, निलेश शिवतरे, सागर घोरपडे, येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दि. १३ जुलै रोजी नियंत्रण कक्षामार्फत माहिती मिळाली की, गायत्री इंटरप्रायजेस शेजारी, वडगाव या ठिकाणी एक इसम दुकानामध्ये विनापरवाना देशी विदेशी दारु विक्री करीत आहे, पथकाने गायत्री इंटरप्रायजेस लगत असलेल्या एका दुकाना मध्ये छापा टाकला असता इसम दत्तात्रय अंकुश चव्हाण, वय ३८, रा. दत्तकृपा हौसिंग सोसायटी, वडगाव शेरी हा विनापरवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत असताना मिळून आला असून छाप्यामध्ये एकूण २४५१३/ रुपये किंमतीच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या नमूद इसमाविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री.शिरीष सरदेशपांडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्भानुप्रताप बर्गे, मा.पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड,सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल सय्यद व पोलीस कर्मचारी सुरेंद्र साबळे,रमेश राठोड,रमेश चौधर,निलेश शिवतरे,सागर घोरपडे यांचे पथकाने केलेली आहे.