पुणे दि १५ :- पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन गरजेचे झाल्याने पुणे शहरात एस,एन,डी, टी, महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी विदर्थिनींनी शेवगा, चंदन, लिंबू याच बरोबर अन्य शंभर औषधी वनस्पतींची लागवड केली, हरित मित्र तर्फे चंदनाची रोपे देण्यात आली,पर्यावरण ही आज जगासमोर मोठी समस्या असून यावर मात करण्यासाठी आणि पुढच्या पिढीला स्वच्छ हवा, पाणी
मिळवून देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, या कार्यक्रमातून झाड कसे जगवायचे, त्याचे संगोपन कसे करावयाचे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या कुलगुरू डॉ, शशिकला वंजारी यांनी दिली,सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक दिलीप घोलप आणि हरित मित्रचे डॉ, महेंद्र घागरे यांनी मार्गदर्शन केले,यावेळी डॉ, सचिन देवरे, प्राचार्य । नलिनी पाटील,आनंद जुमूले, प्रा, सुभाष पाटील, वीरेंद्र नगराळे, डॉ, आर, आर, पाठारे, सी,बी, मिसाळ, डॉ, दुर्गा मुराणी आदी मान्यवर उपस्तीत होते व महाविद्यालयाच्या उद्यान अधिक्षिका वंदना जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले