पुणे, दि. १५ :- पुणे शहरात मिसेस इंडिया २०१९ ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. बाणेर येथील ऑर्किड हॉटेल येथे दि.१४ जुलै रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील यांनी सौंदर्य व बुध्दीमत्तेच्या जोरावर स्वतःला सिध्द करत ‘रिनिंग मिसेस इंडिया २०१९’ हा मानाचा किताब पटकावला. मोनिका शेख यांनी रिनिंग मिसेस इंडिया २०१९ ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. बाणेर येथील ऑर्किड हॉटेल येथे दि.१४ जुलै रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. प्रेमा पाटील या मूळच्या कराड येथील असून त्यांनी एम.कॉम पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्या महाराष्ट्र पोलीस दलात मागील ९ वर्षापासून पोलीस अधिकारी म्हणून काम करत असून सध्या त्या विशेष शाखा, पुणे शहर येथे कार्यरत आहेत. या व्यतिरीक्त कार्बोनरी या सामाजिक संस्थेशी सलग्न असून संस्थेकडून केल्या जाणा-या सामाजिक कामामध्ये त्या सहभागी असतात.