चिंचोली दि १६ : -श्री क्षेत्र गहिनीनाथ गड चिंचोली. येथे संत वामनभाऊ वृक्षमित्र मंडळ यांच्याकडून वृक्ष लागवड व शाश्वत संवर्धनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.श्री अनिल गायकवाड,श्री बिभीषण चाटे सर,श्री आरिफ शेख सर उपस्थित होते.महंत विठ्ठल महाराज यांनी.. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे| या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेत वृक्षाचे आपल्या जीवनातील महत्व उपस्थितांना पटवून दिले. त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधवांनी वृक्षारोपन ही काळाची गरज आहे… याविषयी मार्गदर्शन केले. श्री क्षेत्र गहिनीनाथ गड चिंचोली ही भूमी वैराग्याचे महामेरू श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे.येथील भूमीच्या चराचरात,कणाकणात आणि या सम्पूर्ण सृष्टीत आजही श्री संत वामनभाऊ महाराजांचा सहवास आणि शिकवण दिसून येते…आणि ती सूर्य-चंद्र असेपर्यंत राहील.
संत वामनभाऊंनी अडाणी/अशिक्षित रानटी माणसाला योग्य प्रवाहात आणून अध्यात्मिक शिकवणीबरोबरच सामाजिक/पर्यावरणवादी संदेश देऊन खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण आणलं…त्यांच्या या महान सत्कार्याची थोरवी आपणा सर्वांनाच ज्ञात आहे.संत वामनभाऊंच्या सत्कार्याचा व पर्यावरणवादाचा वसा आणि वारसा आपण सर्वजण पामर काय चालवणार पण आपल्या परीने सर्वजण एकत्र येऊन या वर्षांपासून समर्थपणे आणि जबाबदारीने चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चिंचोली गावातील जे बाहेरगावी नोकरदार-व्यावसायिक आहेत त्यांनी व गावातील जे जाणकार आपल्या मातृभूमीसाठी काही जे मदत करू इच्छित आहेत असे सर्व बांधव स्वयंम स्फुर्तीने एकत्र येऊन हा शाश्वत वृक्षारोपणाचा स्थुत्य उपक्रम राबवत आहेत. पूर्ण जबाबदारीने आणि 100% विश्वासपूर्ण एक वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवित आहोत.त्या मध्ये निःसंकोचपणे सर्वजण सहभागी होऊन आपल्या गडाच्या व गावाच्या वैभवात विकासात्मक भर पाडण्यासाठी गावातील तरुण बांधव सहभागी होऊन सहकार्य करत आहेत.प्रत्येकाने आपापल्या परीने एका रोपट्याला त्याचे झाडात रूपांतर होइपर्यंत जेवढा खर्च होईल मग त्यामध्ये(जाळी,पाणी व एकूणच पूर्ण संगोपन)करण्यासाठी जितका खर्च येईल तेवढा खर्च देऊन आर्थिक मदत केलेली आहे.प्रत्येकाला त्याच्या आर्थिक मदतीच्या पटीत दत्तक झाडाच्या जाळीवर त्या व्यक्तीच्या सौजन्याने म्हणून त्या व्यक्तीच्या नावाची पाटी लावलेली आहे.आणि लावलेल्या सर्व झाडांची संपुर्ण काळजी स्वयंप्रेरणेने दिलेल्या पैशातून करणार आहेत.त्या लावलेल्या झाडांची संपुर्ण संगोपनाची जबाबदारी श्री संत वामनभाऊ वृक्षमित्र मंडळ यांनी घेतलेली आहे.श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाला जोडणाऱ्या सर्व रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.आज दि:- 14/07/2019 रोजी पहिल्या टप्प्यात आर्थिक बजेट नुसार 100 झाडे लावली आहेत. त्याला प्रत्येकाला लोखंडी जाळी लावून दर पंधरा दिवसाला पाणी घालण्याचे नियोजन केलेलं आहे.तरी या स्थुत्य उपक्रमात गावातील ग्रामस्थ व तरुण बांधव मोठया संख्येने उपस्थित राहून सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मारुती सांगळे सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री अनिल सांगळे सर यांनी तर उपस्थितांचे आभार श्री शरद सांगळे सर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी श्री अजिनाथ सांगळे सर,श्री जालिंदर मुरलीधर सांगळे,अनिल शिरवाळे,रोहिदास सांगळे,प्रभाकर गर्जे,सचिन सांगळे,संतोष गर्जे,शरीफ शेख,दीपक सांगळे,दिलीप शिरवाळे,अंगद गर्जे, राम गोल्हार,कानिफनाथ गर्जे,निलेश गर्जे, राजेंद्र गर्जे,बबन सांगळे,संदीप सांगळे,संदेश सांगळे,सुनील सांगळे,अजित सांगळे,मुबारक शेख,बाजीराव खेडकर,रमेश गर्जे,अशोक सांगळे,योगेश गर्जे व गावातील ग्रामस्थ व तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब राऊत प्रतिनिधी