पुणे, दि. १९ :-पुणे परिसरात खडकी मध्ये मटका,अड्डा व पत्त्यांचा क्लबवर गुन्हे शाखा, युनिट-४ कडून छापा;टाकुन १९ आरोपींना अटक मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. अशोक मोराळे व मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्री. शिरीष सरदेशपांडे यांना माहिती मिळाली की, खडकी येथील बबलू ऊर्फ जॉन नायर हा खडकी व बोपोडी परिसरामध्ये मटका व पत्त्यांचा क्लब चालवत आहे, माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यासाठी युनिट ४ चे पोलीस निरीक्षक मा. अंजुम बागवान व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी दि. १७ जुलै रोजी माहिती काढून खडकी येथे बबलू ऊर्फ जॉन नायर याच्या दोन जुगार अड्डयावर पुणे पोलिसांनी छापे टाकले.व मध्यरात्री देशी दारूच्या दुकानामागे, बोपोडी या ठिकाणी पत्त्यांचा क्लब चालू असलेल्या ठिकाणी छापा घालून एकूण ७७, हजार ७६०रुपये रोख रक्कमेसह इतर जुगाराचे साहित्य व १५ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच साई मंदिराशेजारी, रेल्वे भिंतीलगत दिवसा घातलेल्या छाप्यामध्ये मटका जुगाराच्या चिठ्ठया व रोख रक्कमेसह एकूण २ हजार ४७० रुपयांचा मुद्देमालासह ४ आरोपींना अटक केली. अशाप्रकारे दोन छाप्यामध्ये एकूण ८०, हजार २३० रुपयांचा मुद्देमाल व एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली.आहे सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. निलेश महाडीक व पोलीस कर्मचारी अब्दुल सय्यद, शंकर पाटील, राजू मचे, सचिन ढवळे, रमेश चोधर, निलेश शिवतरे, सुरेंद्र साबळे यांनी केली.