पुणे दि २१ : – पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात राहणारा नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वप्नील गणशे शिंदे (वय 31, रा. सदाशिव पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश रामचंद्र शिंदे यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नीलने घरातील खोलीचे दार आतून लावून, छताला पडद्याच्या पट्टीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
स्वप्नील शिंदे हे नाट्यक्षेत्रात कार्यरत होते. मंत्रा या मराठी चित्रपटासह अन्य चित्रपटांसाठी त्यांनी सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली होती.