मुंबई दि २१ : – छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दोन परदेशी महिलांना यांच्याकडे साडेपाच किलो द्रवरूप कोकेनसह महिलांना अटक करण्यात आली.आहे कोकेनची किंमत १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले.
मेरेलेस गार्सिया युरिंका इलिमार (३१, वेनेझुएला) व हाड्री वेनेस्का विनहास कोस्टा (२१, ब्राझील) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलांची नावे आहेत. विमानतळावरील ग्रीन कॉरिडॉरपर्यंत आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. मेरेलेसकडे तीन किलो १८० ग्रॅम आणि हाड्रीकडे दोन किलो १९० ग्रॅम कोकेन सापडले. या तस्करीचे धागेदोरे दक्षिण अमेरिकेतील अमली पदार्थ माफियांपर्यंत पोहोचले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
उच्च प्रतीच्या कोकेनमध्ये भेसळ करून बनवलेली भुकटी किरकोळ बाजारात विकली जाते. ही प्रक्रिया सोपी असल्यामुळे कोकेनला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या परदेशी महिलांकडून जप्त करण्यात आलेल्या द्रवरूप कोकेनपासून ५० किलोपेक्षा जास्त भेसळयुक्त कोकेन बनवले जाऊ शकते. त्यानंतर त्याची किंमत अब्जावधी रुपयांवर जाते.
द्रवरूप कोकेन अधिक घातक द्रवरूप कोकेनची खाण्याच्या पदार्थांमधून तस्करी केली जाते. अमेरिकेत ही कार्यपद्धती फार पूर्वीपासून सुरू असून आता भारतातही सुरुवात झाली आहे.