पुणे, दि. २२ जुलै (प्रतिनिधी): वानवडी पोलिस यांना २१ जुलै रोजी बातमी मिळाली, इनामदार ग्राऊंड शेजारी, एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला, कंजारभाट वस्ती, महंमदवाडी येथे हातभट्टीची बनवली जाती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व स्टाफ यांनी २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता धाड टाकून ४०० रूपये किमतीचे २० लिटर दारू असलेले कँड जप्त
केलेल्यायात व आरोपी भारती बिनावत उर्फ भारती चौहान (वय ४५, रा. महंमदवाडी) हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.यापैकी १८० मिलीलिटर दारू सॅम्पल म्हणून काढून घेऊन इतर दारू व कँड पंचांसमक्ष नष्ट केली आहे.सदर कारवाई ही, वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, गायकवाड, दंघाव, पोतदार, खताळ, बोरावके, दूनघव, माळी यांनी यांनी केली.