पुणे दि, २४ : – पुणे शहरातील फ्लॅट खरेदी विक्रीच्या व्यवहाराबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात पती पत्नीला आरोपी न करण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे.उमेश दत्तात्रय मानकर (वय ४१ वर्षे, पोलीस नाईक), शरद अर्जुन पवार (वय ३१ वर्षे पोलीस नाईक /7724, दोघे- नेमणुक खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.फ्लॅटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारा संबंधाने खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये पती पत्नीला आरोपी न करण्यासाठी उमेश मानकर व शरद पवार या दोघांनी २ लाख रुपयांची मागणी केली.त्यानंतर याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी करून पथकाने खडक पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यामध्ये या दोन्ही आरोपी लोक सेवकांना अटक करण्यात आलेले आहे.