नरसिंहपूरचे सुपुत्र श्री.दत्तात्रय कोळी यांची महाराष्ट्र राज्य आदिम विकास परिषदेच्या इंदापूर तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र राज्य आदिम विकास परिषदेचे अध्यक्ष मा.श्री. अविनाशजी कोळी साहेब यांनी केली.
त्यांची निवड झालेमुळे नरसिंहपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार मा.सरपंच श्री. नरहरी काळे व मा.श्री. दत्तात्रय ताटे विलास ताटे संतोष मोरे यांचे हस्ते करणेत आला.
याप्रसंगी , प्रकाश काळे,, सुनिल मोहिते,आबा कोळी, राजू बळवंतराव, राहूल माने,दशरथ राऊत,संतोष रिकिबे,विजय भोसले, सोनार महाराज,आप्पा गायकवाड.आदि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
याप्रसंगी दत्तात्रय कोळी म्हणाले की मला जरी कोळी समाजाचा अध्यक्ष बनविले असले तरी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करिन.
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी. बाळासाहेब सुतार