पुणे, दि. २८:- पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहआयुक्त रविंद्र शिसवे, गुन्हे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सर्व युनिट अधिकाऱ्यांनी पुणे शहरात परिमंडळ १ ते ५ दि २८ रोजी रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतपुणे शहर पोलिसांनी केले कोम्बिंग ऑपरेशन आस्थापनावर कारवाई करण्यात आली एकूण २६ गुन्हेगारा पैकी तीन एक जेलमध्ये चार व१४ मिळून आले व पाच आरोपी मिळून आले नाही तसेच घरफोडे, तडीपार, रेकॉर्डवरील फरार असे ११० गुन्हेगार पोलिसांनी चेक केले आहेत.सदर गुन्ह्यात २५ गुन्हेगार तुरूंगात, ८ गुन्हेगार तडीपार व १ मयत आढळला. यात एकूण ३० गुन्हेगार मिळून आले असून ४६ गुन्हेगार मिळून आले नाहीत. मिळूनआलेल्या गुन्हागारांकडून इंट्रॉगेशन अर्ज भरून घेतले आहेत. या दरम्यान बंडगार्डन, डेक्कन, हडपसर, कोंढवा, वानवडी, मुंढवा येथे एकूण ३८ हॉटेल व पब चेक केले त्यापैकी सोशल हॉटेल ३६० डिग्री हॉटेल बार पब हॉटेल व २ पाणटरीवर शर्तीपेक्षा जास्त वेळ चालू ठेवले म्हणून एकूण १९ खटले दाखल केले आहेत. तसेच वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बियर शॉपीवर असलेल्या हॉटेलवर छापा टाकून विनापरवाना देशी व विदेशी दारू विकताना मिळून आले असून त्यात एकाला अटक केली आहे. यात ५३ बाटल्या व एक हजार वीस असा एकूण दोन हजार दोनशे 90 रुपये रूपयाचा माल जप्त केला आहे. लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील विमा पुरी कॅम्प पुणे येथे छापा टाकून 15 जणांना पकडून त्यांच्या ताब्यातून किंमत रुपये 9440 रोख व पत्त्यांचे पाणे मिळून आले भागवत नगर वारजे माळवाडी मुख्य रोडलगत सर्वजनिक मोकळ्या जागेत येथे छापा टाकला असता एक इसम अवैद्य दारू विकताना सापडला त्याच्याकडून किंमत रुपये आठशे दहा रुपये अवैद्य दारू विक्री करताना मिळून आले या दरम्यान भारती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक इसम एका मुलीकडून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे आढळले असून या तीघांना अटक केले असून पिडीत मुलीची सुटका केली आहे.सदर कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस अरुण वायकर, गजानन पवार, राजेंद्र मोकाशी, अंजुमन बागवान, दत्ता चव्हाण, राजेंद्र मोहिते, श्री. टिकोळे व श्रीमती वैशाली चांदगुडे व त्यांच्या पथकातील कर्मचार्यांनी कारवाई केली आहे.