सातारा, दि. ३१ : – जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 405.48 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 37.22 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 50.28 (940.18) मि. मी., जावळी- 41.33 (1111.05) मि.मी. पाटण-72.91(1027.57) मि.मी., कराड-52.15 (508.08) मि.मी., कोरेगाव-18.78 (387.22) मि.मी., खटाव-13.64 (230.90) मि.मी., माण- 5.71 (117.41) मि.मी., फलटण- 5.89 (150.22) मि.मी., खंडाळा- 17.10 (322.40) मि.मी., वाई – 30.57 (483.94) मि.मी., महाबळेश्वर-97.10 (3510.86) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 8789.85 मि.मी. तर सरासरी. 684.77 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना 294 (3222) मि.मी., नवजा 214 (3759) मि.मी., महाबळेश्वर 182(3129) मि.मी.
प्रमुख धरणातील पाणीसाठा
कोयना धरणाची पाणीपातळी 2135.05 फूट झाली असून 74.894 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम- 5.97(51.03), धोम-बलकवडी- 3.49 (88.23), कण्हेर- 8.12 (84.67), उरमोडी- 5.89 (61.04), तारळी- 5.04 (86.34), निरा-देवघर 9.07 (77.37), भाटघर- 16.38 (69.70), वीर – 9.26 (98.45).