बोरघर / माणगांव :- माणगांव तालुक्यात संततधार पडणार्या पावसामुळे तालुक्यातील टिकमभाई मेथा काॅलेजच्या क्रिडांगणाला अक्षरशः जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या काॅलेजचा संपूर्ण परीसर पाण्याने व्यापलेला दिसून येत आहे.
माणगांव तालुक्यातील प्रमुख काॅलेज मधील एक असलेले टिकमभाई मेथा वाणिज्य तथा काॅमर्स काॅलेज माणगांव शहरा पासून काही अंतरावर बामणोली रोडला लागून आहे. या काॅलेजला विस्तिर्ण असे क्रिडांगण लाभले आहे. या क्रिडांगणाला लागून नदी असल्याने या नदीने आपल्या पाण्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीचे पाणी या काॅलेजच्या क्रिडांगणात घुसले असून या पाण्याने काॅलेजच्या संपूर्ण क्रिडांगणाला पूर्ण पणे व्यापून टाकले आहे. त्यामुळे या काॅलेजच्या क्रिडांगणाला मोठ्या जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे संपूर्ण टिकमभाई मेथा काॅलेज परीसर जलमय झालेला दिसून येत आहे.
फोटो कॅप्शन :- सोबतच्या छाया चित्रात दिसणारी इमारत म्हणजे कोणत्याही स्विमिंग पूलची नसून ते रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील टिकमभाई मेथा काॅलेजची आहे. तालुक्यात संततधार पडणार्या पावसामुळे नदीचे पाणी सदर काॅलेजच्या क्रिडांगणात घुसल्याने या काॅलेजच्या क्रिडांगणाला एखाद्या जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे
. ( छाया : पत्रकार विश्वास गायकवाड बोरघर / माणगांव )