जन्म. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी अंबाला येथे. कपाळावरील मोठी लाल टिकली, भांगामध्ये सिंदूर, मोठ्या काठांची कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ही सुषमा स्वराज यांची ओळख १९७७ पासुनच निर्माण झाली. आपल्या वक्तृवानं सुषमा भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचला. त्यांचे शिक्षण बीए आणि एलएलबी.
सुषमा स्वराज यांनी १९७७ ते ८२ आणि १९८७ ते ९० सालापर्यंत हरियाणा विधानसभेच्या आमदार म्हणून काम केलं. १९७७-७९ दरम्यान सुषमां स्वराज यांनी हरियाणा सरकारमध्ये विविध मंत्रीपदं सांभाळली. १९९०मध्ये सुषमा स्वराज यांची पहिल्यांदा राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठीही त्या उमेदवार होत्या.
१९९६ मध्ये सुषमा स्वराज पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. ११ व्या लोकसभा निवडणुकीत १६ मे-१ जुन १९९६ दरम्यान त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं.
सुषमा स्वराज या प्रामुख्यानं समोर आल्या, जेव्हा त्या १९९९ मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात निवडणुकीत उभ्या राहिल्या. ही निवडणूक त्या हरल्या. त्यानंतर २००४ मध्ये जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसनं पुढं आणलं तेव्हा सुषमा स्वराज यांनी त्याचा खूप विरोध केला. देशातील सर्वोच्च स्थानी जर परदेशी महिलेला बसवलं तर स्वत:ला बोडकं करणार… सुषमा स्वराज यांच्या या धमकीनंतर देशात एक मोठं नाट्य घडलं होतं. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या २००९ म्हणून मध्ये त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.
त्यांनी मोदी सरकार मध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाची धुरा समर्थपणे सांभाळी होती.
सुषमा स्वराज यांनी मिझोरमचे माजी राज्यपाल व वकिल स्वराज कौशल यांच्यासोबत विवाह केला होता. लग्न झाल्यावर सुषमा स्वराज यांनी अडनाव म्हणून पतीचे नाव ‘स्वराज’ लावण्यास सुरुवात केली.
सुषमा आणि स्वराज कौशल यांना एक मुलगी आहे. तिचे नाव बांसुरी आहे. श्रीकृष्ण हे आवडते दैवत असल्यामुळे सुषमा यांनी मुलीचे नाव बांसुरी ठेवले. ती देखील वकील आहे. सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली.