निरा नरसिंहपूर:दि.०७:-इंदापूर तालुक्यातील श्री श्रेञ निरा नरसिंहपूर येथील पूर परिस्थित गंभीर बनलेली आहे.पुरामुळे गावातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे.दरम्यान,पुरामुळे गावातील सुमारे 90 कुटुंबाचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे. श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात जाणेसाठी होडीचा वापर करावा लागत आहे.गावातील अनेक दुकाने पाण्याखाली गेली. मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील अनेक दुकाने पाण्याखाली गेली आहेत.तेथे सुमारे 10 ते 12 फूट पाणी आहे.
तसेच गावातील अनेक रस्तेही पूराच्या पाण्याखाली गेलेले आहेत.त्यामुळे गाव जलमय दिसत आहे. गावातील अनेक कार्यालये पाण्याखाली गेली आहेत.शिवाय अनेक घरे पाण्यात आआज बुधवारी उजनी धरणातून भिमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. तर वीर मधुन निरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.त्यामुळे श्री क्षेञ नरसिंहपूर कडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.बावडा- नरसिंहपूर रस्त्यावर गणेशवाडी येथिल पुलावर पाणी आहे.आज बुधवारी सकाळी माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील, आ.दत्ताञय भरणे,अप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील आदिंनी पूर परिस्थितीची पाहणी केली.माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी दुपारी पूरग्रस्तांना 7 क्विंटल साखर व 7 क्विंटल तांदूळाचे वाटप केले.सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी पूरग्रस्तांसाठी लागणारे लहान मुलांच्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे दूध व गॅस सिलेंडर देऊन सहकार्य केले तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्ता मामा भरणे यांनी पूरग्रस्तांच्या जीवनासाठी दुधाचे वाटप केले निरा नरसिंहपूर गावात पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता जाणवत आहे.त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान,पुर पाहणेसाठी नागरीक गर्दी करीत आहेत.प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.