पुणे, दि.१२ :- पुणे शहरामध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यत वाढ होत असल्याने गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने पुणे शहरातील पोलिस पेट्रोलिंग करीत असताना पोहवा अजय थोरात यांना खबर मिळाली की जगताप हॉस्पिटल सिंहगड रोड येथून दुचाकी चोरी करणारी संशयीत महिला ही तिच्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांच्या परवानगीने युनिट-१, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिच्या घरी जाऊन संशयीत महिलेस ताब्यात घेतले. तिने तिचे नाव मुग्धा अभयकुमार कोडीलीकर, वय २० वर्षे, रा. श्रीविहार सोसायटी, रो हाऊस नं. ४, ज्ञानदीप शाळेजवळ, नऱ्हेगाव, पुणे असे असल्याचे सांगितले. ती स्वतः वापरत असलेली दुचाकी तिने दोन महिन्यांपूर्वी जगताप हॉस्पिटल, सिंहगड रोड येथून चोरली असल्याचे सांगितले. सदरची पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची डिओ मोटार सायकल तिच्याकडून जप्त केली असून, पुढील कारवाईसाठी आरोपी महिलेस सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री अशोक मोराळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री बच्चन सिंग यांच्या मार्गदशनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन पवार, पोलीस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, वैभव स्वामी, अनिल घाडगे, महिला पोलीस कर्मचारी आरती कांबळे यांनी केली आहे.