पुणे दि,१२ :- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही ही कसून तपासणी केली जात आहे. प्रवाशांनी विमान उड्डाणापुर्वी काही तास आधी पोहचावे असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.
ब्युरो ऑफ सिव्हील अॅव्हीएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) देशभरातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट दिला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जाते.व सुरक्षा व्यवस्था दि. ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ)कडून प्रवाशांसह विमानांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी दलाच्या जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे. विमानांमध्येही प्रवाशांची कसून तपासणी करण्याच्या सुचना विमान कंपन्यांना दिल्याचे दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आहे प्रवाशांकडून सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.आहे