.पुणे, दि.१२:- आज केवळ महाराष्ट्रच नव्हे तर निम्मा देश पूरग्रस्त झाला असून शासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक मोठ्या प्रमाणात मदत करीत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.त्यासाठी देवस्थानांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन वनश्री पुरस्कार विजेते महेंन्द्र घागरे यांनी केले.
घागरे मित्र परिवाराच्या वतीने कर्वे रस्त्यावरील घागरे रेसीडन्सी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश परांजपे, पर्यावरणप्रेमी डॉ.पंडित गावडे, उध्यान उपअधीक्षक प्रीती सिंन्हा, मनीष सोनवणे,पर्यावरण प्रेमी धीरज वाटिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भक्तांनी दिलेला दान पेटी पेटीतील निधी हा प्रत्येक देवस्थानाकडे कोट्यवधी रुयांचा पडून आहे.जर संकटकाळी हा निधी उपयोगी पडणार नसेल तर काय उपयोग. देशभरातील देवस्थानानी याचा विचार करावा व मदतीचा हात पुढे करावा, असेही घागरे यांनी नमूद केले.
भक्तच नसतील तर दानपेटीत निधी येणार कुठून असा टोला सोनवणे यांनी मारला.
याबाबत मुख्यमंत्र्यांना सह्याचे निवेदन रवाना केले आहे असेही त्यानी सांगितले.