पुणे : दि.12:- पुणे बिबवेवाडी पोलीस ठाणेकडील पोलिस कर्मचारी स.पो.फौ. श्री. शिंदे व पोलीस शिपाई पुजारी हे पोलीस ठाणे हद्दीत गंगाधाम रोड ने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक संशयीत कार कोंढव्याच्या दिशेने जाताना दिसली असता सदर कार बाबत त्यांना संशय आल्याने त्यांनी ती कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने कार न थांबवता निघुन जात असताना त्यांनी तिचा पाठलाग करुन थोडयाच अंतरावर कार थांबवली असता त्यामध्ये वेगवेगळया रंगाचे प्लॅस्टीकचे कँड दिसल्याने त्याची पाहणी केली असता त्यामध्ये हातभट्टीची दारु असल्याने त्या गाडी चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता.
कृपाल किशनदेव शर्मा वय-२६ वर्षे रा. शेलार मळा, कात्रज, पुणे असे असल्याचे सांगितले. शिंदे यांनी मदतीसाठी पोलीस स्टाफ मागवुन वरिल कार चालकाच्या ताब्यात मिळुन आलेली किंमत रुपये १७५०० रुपये ची ३५० लिटर हातभट्टीची दारु व एक झेन मारुती कार नं.MH-14-H-8256 जु.वा.कि.अं.एक लाख असा एकुण एक लाख 17,500/- रुपये किंमतीचा माल पंचनाम्याने जप्त करुन ताब्यात घेतला असुन पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे आरोपीस मा.न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेसाठी हातभट्टी दारु कोठून आणला आहे. कोठे घेवुन चालला होता. कोणाला देणार होता. या मध्ये आणखीन कोण कोण आहेत याचा तपास बिबवेवाडी पोलिस करीत आहोत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मुरलीधर करपे यांचे मार्गदशना प्रमाणे सपोनि श्री पावसे, पोउपनि श्री काळे, सपोफौ श्री शिंदे, पो.हवा.चिप्पा, पो.शि. पुजारी ,मोरे, शिंदे, महांगडे, लोधा, कुलकर्णी, सोरटे यांनी केली आहे.