नीरा नरशिहपुर.दि.२१:- शेटफळ हवेली ता. इंदापूर यथे इंदापूर तालुका शिवसेनेच्यावतीने यापूर्वी एसटी चे स्मार्ट काढण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता . यावेळी साधारण ५०० कार्ड नोंदविण्यात आली होती. या सर्व लोकांची कार्ड तयार झालेली असून त्याच्या वितरणाच्या कार्यक्रमानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले.
तसेच यावेळेस सुरवड गावांमध्ये नवीन शिवसेनेची शाखा निर्माण करण्यात आली. या शाखेची शाखाप्रमुख श्री कांबळे सर तसेच उपशाखाप्रमुख लखन वाघ यांच्या माध्यमातून शाखा काढण्यासाठी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी केले होते.व उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र काळे व उपजिल्हाप्रमुख संजय काळे होते या कार्यक्रमाला माजी तालुकाप्रमुख विषाल बोंद्रे , भीमराव आप्पा भोसले , शहर प्रमुख महादेव सोमवंशी उपशहर प्रमुख संजय खंडागळे ग्राहक मंचाचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत गायकवाड, एसटी कामगार सेनेचे पुणे जिल्हा सचिव दादा माने, उपतालुका प्रमुख अरुण तात्या पवार, सुदर्शन रणवरे संदीप चौधरी यांनी विशेष हजेरी लावली यांनी विशेष हजेरी लावली यामध्ये साधारण तीनशे ते साडेतीनशे लोकांची कार्ड वाटप करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांनी विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी जनतेकडून शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्यावर स्तुतीचा वर्षाव झाला .
प्रतिनिधी .इंदापूर तालुका :-बाळासाहेब सुतार