पुणे दि २४:- पुणे शहरातील श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी परिसरातील स्वच्छता
पुना हॉस्पिटल नजीकच्या मुठा पात्रातील श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी परिसरालगतची पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली.
नदीपात्रातील पाणी ओसरल्यानंतर नदीपात्रात वाहून आलेले टाकावू पदार्थ, विविध वस्तू, कपडे, झाडे, झावळ्या, वाहून
आलेले माती व अन्य घटक या सर्व बाबींचा कचरा काढून घेणे, सफाई कामे करणे, काढण्यात आलेला कचरा वाहतूक करणे याकामी कसबा-विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी परिसरातील स्वच्छता केली.