पुणे, दि. ३१ :– पुणे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे दिनांक ३१/०८/२०१९ रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत ३७ वी परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धे मध्ये पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील एकूण १६० पोलीस खेळाडूंच्या ४ संघानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, कुस्ती, बॉक्सिंग, ज्यूदो अशा प्रकारच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या, जनरल चॅम्पियनशिप ट्राफीचा मान मुख्यालय व इतर
शाखा या संघाने पटकवला. स्पर्धेच्या समारोप प्रसंगी घेण्यात आलेल्या १०० मी. धावणे या क्रिडा प्रकारामध्ये पुरुष गटात पोशि महेश आव्हाळे याने प्रथम क्रमांक, पोशि गोविंद कोळेकर याने व्दितीय क्रमांक तर महिला गटात मपोशि दिपा पवार हिने प्रथम क्रमांक व मपोशि पल्लवी वराळे हिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच समारोप प्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर पोलीस अधिकारी यांचेमध्ये ‘रस्सी खेच’ हा विशेष क्रिडा प्रकार घेण्यात आला. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी गटाने विजेतेपद पटकाविले. तसेच चीन येथे झालेल्या जागतिक पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करुन पुणे शहर पोलीस दलाचे नाव उज्वल केलेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार मा.डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते सर्व विजेत्या खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.विरेंद्र मिश्र पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, आभार प्रदर्शन श्री.संभाजी कदम,पोलीस उप आयुक्त, यांनी केले. सदर कार्यक्रमाकरीता मा.पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम्, मा.सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, श्री अशोक मोराळे, श्री.सुनिल फुलारी, श्री.श्रीकांत तरवडे, सर्व पोलीस उप आयुक्त व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी/कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते.