बरडशेवाळा ता.०७ :- शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेमध्ये सहभाग घेऊन चिंचगव्हान येथील सहशिक्षक हरिशचद्रं चिल्लोरे यांनी एक मे २०१९ पासून चिचगव्हान येथे जिवनांकुर सेवाभावी संस्थेची स्थापना करून शाळेचा परिसर, स्मशानभूमी, कब्रस्तानात दर रविवारी सुट्टीच्या दिवशी श्रमदानातून स्वच्छता अभियान सुरूवात करुन यशस्वी ठरले. स्वच्छता अभियानाला गावातील नागरिकांचाही सहभाग वाढत असल्याने महत्त्वाचा उपक्रम म्हणजे वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून यासाठी शासनाकडुन लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड चळवळीला सुरू करण्यात आली.शाळेच्या परीसरात, स्मशानभूमीत, कब्रस्तानात, शासकीय कार्यालये, गावात मे महिन्यात वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपनासाठी पुढाकार घेऊन लोखंडी जाळी लावत पाणी टंचाई असताना देखील पाणी उपलब्ध केले. ११ जुलै २०१९ रोजी वडील संभाजी चिल्लोरे यांचे निधन झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ हरिशचंद्र चिल्लोरे यांनी पर्यावरण पोषक वृक्ष कडुलिंब,वड, पिंपळ,उमर, बेलपत्राचे १०१ वृक्ष व संगोपनासाठी लोखंडी जाळी स्वखर्चाने लावत वृक्षारोपण कार्य निस्वार्थीपणे हाती घेतले.वृक्षप्रेमी युवकांनी चांगला प्रतिसाद देत हरिशचंद्र चिल्लोरे यांच्या संकल्पनेला तडा जाणार नाही याची दक्षता घेत वृक्षांचे संगोपण जबाबदारी घेऊन चिंचगव्हान , बामणी फाटा,बरडशेवाळा,हदगाव शालेय परिसर, मंदिर, सार्वजनिक ठिकाणी दर रविवारी सुट्टीच्या दिवशी १०१ वृक्ष लावुन त्यांचे संगोपन करण्यासाठी लोखंडी जाळी लावून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवलेले उदिष्ट पुर्ण केले असून जिवनाकुंर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून व लोकसहभागातून दोनशे वृक्ष व १०१ वृक्ष वडिलांच्या स्मरणार्थ एकुण तिनशे वृक्ष लावुन त्यांचे संगोपन केले असल्याने हरिशचंद्र चिल्लोरे यांच्या उपक्रमांचे चिंचगव्हान ,बामणी फाटा ,बरडशेवाळा परीसरात कौतुक केल्या जात आहे.मी सुरू केलेल्या स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्याला जिवनांकुर सेवाभावी संस्थेसह लोकसहभाग मिळाला असल्याने वडिलांच्या स्मरणार्थ १०१ वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन भर उन्हाळ्यात वृक्ष वाचले असुन हाती घेतलेले कार्य यशस्वी झाले असून मनालाही आनंद मिळत आहे. लोकसहभाग मिळत असल्याने पाचशे वृक्ष उदिष्ट पुर्ण करणार आहे.वृक्ष प्रेमी शिक्षक हरिशचद्रं चिल्लोरे
संदीप तुपकरी नांदेड प्रतिनिधी