• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

तरुणीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला २४ तासाच्या आत पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/09/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०७ : – पुणे शहर ससाणेनगर हडपसर येथे राहणाऱ्या तरुणीस बारामती, गोजुबावी येथे घेवून जावून गंभीर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न करून तिचे दागिने व इतर साहित्य घेवून पळून गेलेल्या अज्ञात आरोपीचा २४ तासाच्या आत शोध घेवून त्यास हडपसर येथून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (एल.सी.बी.) पथकाने अटक केली आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक २ रोजी गोजुबावी, आटोळे वस्ती ता. बारामती येथे पहाटे ०५.०० वा.चे सुमारास तेथील ग्रामस्थांना एक तरूणी गंभीर जखमी होऊन बेशुध्द अवस्थेत आढळून आली होती.
त्यांनी पोलीसांना कळवून जखमी तरुणीस बारामती सिल्वर ज्युबली हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले.
तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून बारामती पोलीसांनी हडपसर पोलीस स्टेशनमार्फत हडपसर येथे राहणारे तिच्या नातेवाइक, आईवडीलांना संपर्क साधून तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पीटलच्या आयसीयुमध्ये अ‍ॅडमीट केले. या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर उपचार चालू आहेत. मुलीच्या वडिलांनी त्यांची २२ वर्षीय मुलगी ससाणेनगर, हडपसर येथून पुणे हिस तिचा अज्ञात मित्र नाव पत्ता माहीत नाही याने मोटरसायकलवरून घेऊन जावून कोणत्यातरी कारणावरून तिचा खून करण्याचे उद्देशाने तिच्या डोक्यात, कानाच्यावर व उजव्या डोळ्यावर दगडाने गंभीर मारहाण करून तिच्या कानातील रिंगा, बॅग, कपडे व इतर साहित्य असा माल जबरीने पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने घेऊन गेलेबाबत फिर्याद दिली होती. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनला भा.दं.वि. कलम ३०७,३९७,२०१ प्रमाणे दि.५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तो तात्काळ उघडकीस आणून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीस अटक करणेकामी गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील व बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, नितीन भोर, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अक्षय जावळे यांचे पथक नेमून गुन्ह्याची माहिती घेत तपासाला सुरूवात केली. सदर पथकाने परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची पडताळणी करून काळे रंगाचे सीडी डिलक्स गाडीवरील संशयीत आरोपी निश्चित केला.
त्याप्रमाणे संशयित आरोपीचे फोटो बनवून त्याआधारे हडपसर परिसरात तरुणी जेथे कामास होती त्या ठिकाणी जावून तेथील कामगार, वॉचमन, तरूणीचे मित्र, मैत्रीण यांचेकडे तपास करून फोटो दाखवून माहिती काढली असता तो फोटो हडपसर येथे पूर्वी सिक्युरीटी गार्डचे काम सोडून गेलेला युवराज दिगंबर ढेरे वय २२ रा.साडेसतरानळी, सव्हें नं.२०३, हडपसर, पुणे याचा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याच्या परिसरामध्ये जावून माहिती काढली असता तो चारपाच दिवसापासून बाहेर जाताना मास्क लावत असल्याची व तो सध्या साडेसतरा नळी चौक येथे तोंडाला मास्क लावून थांबल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी लागलीच त्यास सापळा रचून ताब्यात घेत चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलीसी खाक्या दाखवताच त्याने मैत्रीणी सोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून मोटरसायकलवर घेवून जावून खून करण्याचे उद्देशाने दगडाने मारहाण केल्याचे सांगितले. सदर आरोपीस पुढील कारवाई करीता बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेवून अज्ञात आरोपीस २४ तासात ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणल्याने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर केलेले आहे.

Previous Post

पुणे शहरात ऑनलाइन लॉटरीच्या नावा खाली जुगार घेणाऱ्याला अटक

Next Post

इंदापूर महसूल विभागाची वाळू माफियांवर मोठी कारवाई

Next Post

इंदापूर महसूल विभागाची वाळू माफियांवर मोठी कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist