• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, May 11, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भोसरी मतदारसंघात शिवसेनेच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/09/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पिंपरी (दि. २३  :- ‘मी मातोश्री वरून बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन निघालो आहे. ज्यांनी आजवरच्या शिवसेनेच्या वाटचालीत शिवसेनेला सहकार्य केले. त्यांचे आभार मानण्यासाठी व जे अजूनही शिवसेनेच्या विचारापासून दूर आहेत त्यांची मने जिंकण्यासाठी मी निघालो आहे. माझी ही जनसंवाद यात्रा कोणत्याही पदासाठी नसून, भोसरी विधानसभा मतदारसंघात नव-परिवर्तन घडविण्यासाठी आहे. आपली मने जिंकली म्हणजे भोसरी मतदारसंघातील प्रत्येक माणूस जिंकला असे म्हणता येईल. आपण माझ्यासोबत असाल तर, हात उंचावून साद द्या’, असे आवाहन भोसरी विधानसभा इच्छुक उमेदवार व शिवसेना भोसरी-खेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार पुन्हा आणण्याकरीता इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जनसंवाद यात्रेचा आज सोमवार (दि. २३) रोजी शुभारंभ करण्यात आला. भोसरी मतदारसंघातील रुपीनगर येथील एकता चौक येथे गगनभेदी घोषणांच्या सुरात इरफान सय्यद यांच्या हस्ते गणेश मंदिरात श्रींचे व छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ वाढवून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्या प्रसंगी सय्यद बोलत होते. त्यानंतर मतदारसंघात जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेदरम्यान सय्यद यांचे घरोघरी नागरिकांनी स्वागत केले. तसेच महिलांनीही आपल्या लाडक्या बंधूना औक्षण केले. यावेळी सय्यद यांनी ज्येष्ठ महिला-भगिणींचे आशिर्वाद घेतले. उपस्थित नागरिकांनी इरफान सय्यद यांच्यावर पुष्पवृष्टीही करीत आम्ही तुमच्यासोबतच आहोत अशी पुष्टीही जोडली.
याप्रसंगी जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, सहसंपर्क प्रमुख इरफानभाई सय्यद, उपजिल्हा प्रमुख निलेशजी मुटके, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपशहर प्रमुख आबा लांडगे, नेताजी काशीद, शहर संघटिका आशाताई भालेकर, माजी नगरसेविका छबुताई कदम, संघटक अनील सोमवंशी, सर्जेरावजी भोसले, समन्वयक परशुराम आल्हाट, राहुल गवळी, विभागप्रमुख-विश्वनाथ टेमगिरे,  सुखदेव नरळे, प्रदीप सपकाळ, सतीश दिसले, युवा सेनेचे रूपेश कदम, सचिन सानप, सुनील समगर, अमित शिंदे, किशोर शिंदे,देवा कुलकर्णी तसेच सर्व प्रभागातील उपविभाग प्रमुख,अशोक जाधव, मोहन जाधव शाखा प्रमुख नितिन बोंडे,दिपक सोनवणे,प्रवीण पाटिल, शिवाजी शेळके, काळू शिंदे, विठल लबड़े,जेष्ठ शिवसैनिक सुरेश कदम, कैलास नेवासकर, दिलीप सावंत,दिलीप दंडवते,पांडुरंग कदम, सुरेश कदम,बलिराम जाधव,ढोले पाटिल,अभिमन्यु सोनसले, कृष्ना सोनगिरे,अशोक पाटिल,पतंगे सर,दिलीप सुतार,संतोष पवार, भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिक, शाखा प्रमुख व मित्र परिवार, तसेच मतदारसंघातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना इरफान सय्यद म्हणाले की, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घरा-घरात, गल्लोगल्ली जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच आपल्या मतदारसंघातील स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी तुमच्याशी संवाद साधणार आहे. जनसंवाद यात्रेचा हेतूही तोच आहे. मतदारसंघातील प्रत्येक माणूस शिवसैनिक व्हावा. त्याशिवाय महाराष्ट्र भगवा करता येणार नाही. शिवसेनेची विचारधारा सर्वसामान्याच्या विकास व उद्धारासाठी आहे. जेथे त्रास आहे, तेथे मदत करणे, अन्याय असेल तेथे न्याय मिळवून देणे; यासाठीच शिवसेना कार्य करीत आली आहे. माझी ही यात्रा म्हणजे तीर्थयात्रा असल्याचे सांगून तुम्ही यासाठी तयार आहात का? यासाठी मला आशीर्वाद देणार का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी जनतेला हात उचावून साथ देण्याचे आवाहन केले.
Previous Post

पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, विजय चौधरी यांनी पदभार स्वीकारला

Next Post

मतदारांच्या सुविधेसाठी 5400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत

Next Post

मतदारांच्या सुविधेसाठी 5400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In