औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास जोराचा पाऊस झाला.त्यावेळी तपसे चिंचोली- गाडवेवाडी शिवारात संगमेश्वर कुंभार यांच्या शेतात हरणाचे छोटे पिल्लू पावसापासून बचाव करण्यासाठी सैरभैर धावत होते .याचवेळी काही कुत्रे ह्या लहान हरणाच्या पिल्लाचा पाठलाग करत होते.हे लहान पिल्लू आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते. हे पाहताच संगमेश्वर कुंभार यांनी तात्काळ त्या हरणाच्या पिल्लाला त्या कुत्र्यापासून वाचवले व प्राथमिक उपचार करून पुन्हा त्या हरणाच्या पिल्लाला कळपाजवळ सोडले.
लातूर प्रतिनिधी प्रशांत नेटके