नाशिक दि,०९ :- औरंगाबाद शहरात तोतया पत्रकाराने एक कोटी २५ लाखांची खंडणीची मागणी करून पैसे स्विकारतांना तोतया पत्रकाराला अटक करण्यात आली. आहे तोतया पत्रकाराविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला गुरूवापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
औरंगाबाद येथील बाबासाहेब थेटे (५१) यांच्या विरोधात कल्याण येथे यु टय़ूब चॅनेल चालविणारा तोतया पत्रकार विनायक कांगणे हा बातम्या प्रसिध्द करत होता. यामुळे थेटे यांची बदनामी झाली. या आक्षेपाह्र्य़ बातम्या थांबविण्याची मागणी थेटे यांनी केली असता त्यासाठी विनायकने पैशाची मागणी केली व दोन कोटी रुपय मागीतले व तडजोडअंती ही रक्कम एक कोटी २५ लाख ठरली. विनायकने ही रक्कम नाशिक येथील दिंडोरी रोडवरील हॉटेल करी लिव्हज् येथे स्वीकारण्याचे ठरले. दरम्यान थेटे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनायकविरूध्द खंडणी मागितल्याची तक्रार केल्याने पोलिसांनी सापळा रचला. काही रोख रक्कम आणि काही बनावट नोटा देत थेटे यांना पोलीस पथकासह हॉटेल करी लिव्हज् येथे रवाना केले. त्यानंतर विनायकने थेटे यांना हॉटेलऐवजी नाशिकरोड येथे मित्राच्या घरी बोलावले.नाशिकरोड येथे मित्राच्या घरी थेटे हे विनायकला पैसे देत असतांना पोलिसांनी विनायकला रंगेहात पकडले. पोलिसांनी विनायकविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता १० ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.