पुणे,दि ०९ :- पुणे शहरात बिबवेवाडी परिसरात काळविटाच्या शिंगांची तस्करी करणारा अजिंक्य शितोळे (वय १९, रा. सव्हे नं ६२२/५ विघ्नहर नगर महेश सोसायटी पुणे ३७) याला युनिट ३ च्या गुन्हे शाखेकडील पोलिसांनी अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक विल्सन डिसोझा यांना एक इसम काळविटाच्या शिंगांची विक्री करण्यासाठी अशी बातमी मिळाली.होती व सदर बातमी वरिष्ठांना कळवून वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे यांचे मदतीने अप्पर डेपो, बिबवेवाडी येथे सापळा लावून दुपारी ४:५० च्या सुमाराला अजिंक्य शितोळेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून फिक्कट तपकिरी रंगाचा इंग्रची व्हीच्या आकाराचा शिंगाचा एक जोड जप्त करण्यात आला आहे. सदर बाबतीत वनअधिकारी यांच्या मदतीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर कामगिरी गुन्हेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, गुन्हे शाखा प्रतिबंधकचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, फौजदार किरण अडागळे, कर्मचारी किशोर शिंदे, महेबूब मोकाशी, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, नितीन रावळ, संदिप राठोड, अतुल साठे यांच्या पथकाने केली आहे.