दौंड दि,१० :-आज रोजी मा. जयंत मीना(भा पो से), अपर पोलीस अधीक्षक सो बारामती यांना रांजणगाव येथे अवैध दारू विक्री करीत असलेची माहिती गोपनिय मिळाली व मा.ऐश्वर्य शर्मा सो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड(IPS) आणि बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव पो नि श्री सुरेशकुमार राऊत, रांजणगाव पो स्टे यांना सांगून सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले. व एकाच वेळी 8 दारूविक्री करणाऱ्या हॉटेल्स वर रांजणगाव येथे हॉटेल संदीप, अमित, S1, तसेच रांजणगाव MIDC मध्ये हॉटेल मुक्ताई, सुजय, संतोष, न्यू संतोष धमाका वर एकत्रित छापा टाकून रेड केली असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनी च्या ब्लेंडेर प्राइड, mcdowell व्हिस्की, रम, रॉयल स्टेग, वोडका, टू बर्ग बिअर, बुडवाईसर बिअर व इतर अश्या विदेशी व टंगो देशी दारूच्या 1,68,860 रु चा देशी विदेशी दारूचा अवैध माल 60 box व 81,520 रु रोख मिळून आला आहे. आरोपी
1)अक्षय सुखदेव कांबळे रा ढोक सांगवी रांजणगाव शिरूर
2) अमित शहाजी जायकर रा निमगाव महाळूनगे शिरूर
3) बाबासो गोविंद पवार रा ढोक सांगवी, रांजणगाव शिरूर
4) अजिंक्य दिलीप वाडकर रा रांजणगाव शिरूर
5) बाप्पू भरत शिंदे रा रांजणगाव शिरूर
6) दत्ता लक्ष्मण सुरवसे रा संतोष नगर, रांजणगाव शिरूर
7)मानस कुमार मुरलीधर जैना रा रांजणगाव शिरूर
8)आझाद टेकराम सिंग रा. रांजणगाव शिरूर
सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती(IPS)यांचे मार्गदर्शनाखाली,मा.ऐश्वर्य शर्मा सो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड(IPS)बारामती क्राईम ब्रँच पथकाचे,चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक,पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे,पो.कॉ. दशरथ कोळेकर,पो.कॉ. विशाल जावळे,पो.कॉ. शर्मा पवार, आणि राजेंद्र जाधव,पोलीस हवालदार बारामती तालुका पो स्टे श्री.रियाज शेख भिगवण पो.स्टे.जलद कृती दलाचे 10 पुरुष आणि 4 महिला जवान आणि श्री. सुरेशकुमार राऊत पोलीस निरीक्षक, पो. हवा. दादा चमनशेख, पो.ना. प्रफुल्ल भगत, मंगेश थिगले रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी केली.