पुणे – आपल्या मतदार संघातील सामान्यातील सामान्य नागरिकांच्या भेटी घेत, त्यांच्या अपेक्षा जाणून घेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार सुरू आहे.
गुरुवारी चिखलवाडी, रेल्वे लाईन, ओरिएंट कॉम्प्लेक्स या ठिकाणी पदयात्रेतून शिरोळे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्या भागातील अनेक प्रश्नांवर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी नगरसेवक विजय शेवाळे, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, स्वाती लोखंडे, माजी महापौर सुरेश शेवाळे, अनिल भिसे, गणेश नायकरे, मधुकर मुसळे, सचिन वाडेकर, स्वामी नवले, उत्तम बहिरट, सोनाली भोसले, रिटा उपाध्याय, सुभाष बहिरट, सदाशिव मोरे, धनंजय दरे, अनिल तिळवणकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.