पुणे दि.१२:- पुणे शहरात बुधवार पेठ येथील दि १० रोजी गिता लॉज मध्ये वेश्याव्यवसाय चालत आहे अशी माहिती मा. सहा. पोलीस आयुक्त विजय चौधरी अभियोग गुन्हे शाखा पुणे शहर यांना गोपनीय माहिती मिळाली व गिता लॉज, ९ बी, बुधवार पेठ, पुणे ६ येथे इसम नामे १)ज्ञानेश्वर तानाजी सुर्यवंशी वय २८ वर्षे २)बलभिम ऊर्फ बळी अशोक हांडे वय २४ वर्षे, ३)सायबा हजरत अली ऊर्फ सोनू वय ३३ वर्षे हे मुलींना वेश्याव्यवसायासाठीआणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत आहे. खात्री करून सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री विजय चौधरी व पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे यांचे मार्गदर्शनाखाली गिता लॉज, ९ बी, बुधवार पेठ, पुणे ६ येथे ०८.४५ वा.अचानक छापा टाकुन आरोपी यांनी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एकूण ८ पिडित मुलींची सुटका
करण्यात आली. व आरोपी नामे १)ज्ञानेश्वर तानाजी सुर्यवंशी वय २८ वर्षे २)बलभिम ऊर्फ बळी अशोक हांडे वय २४ वर्षे, ३)सायबा हजरत अली ऊर्फ सोनू वय ३३ वर्षे यांचे विरुध्द विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३४२/२०१९ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,७ सह भादंवि क ३७० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.व कारवाई श्री.बच्चनसिंग पो.उप.आयुक्त गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीसआयुक्त श्री विजय चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे व पोलीस उप निरीक्षक श्री.खडके यांचेसह सामाजिक सुरक्षा विभागाकडील म.पो.ना शिंदे, पो.हवा. कुमावत, पो.ना. माने, पो.ना.पठाण म.पो.ना. पुकाळे व पो.शि.खाडे, पो शि, संतोष भांडवलकर, यांनी केली आहे.