पुणे दि१३ :-काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने केवळ नकारात्मक राजकारण केले. मात्र देशात महाराष्ट्रात पुण्यात आणि कासबा विधानसभा मतदारसंघात खरा विकास पोचवला तो भाजपा-शिवसेना महायुती च्या शिवशाही सरकारनेच. यापुढील काळातही हेच विकास पर्व कायम राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,’ असे प्रतिपादन कसबा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सौ. मुक्ता ताई शैलेश टिळक यांनी केले.
कसबा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सौ. मुक्ता ताई शैलेश टिळक यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.नदीपात्रातून रॅली ला सुरुवात झाली. समाधान चौक, राष्ट्रभूषण चौक, लोहियानागर, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर मार्ग या मार्गांनी शनिवार वाडा येथे रॅली समाप्त करण्यात आली. नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
चौका चौकात मुक्ता ताईंना ओवळण्यात आले तसेच हार घालून अभिनंदन करण्यात आले.
कसबा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाईचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. मुक्ता ताई शैलेश टिळक म्हणाल्या, ‘नगरसेवक आणि महापौर पदाच्या कालावधीत जनतेची सेवा करता आली. भेटी दरम्यान जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान मला आनंद देऊन जातो. मतदार मलाच निवडून देतील असा मला विश्वास आहे.’