इंदापूर:प्रतिनिधी दि.१४ :-इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे आणि इंदूरच्या होळकर राजघराण्याचे भूषणसिंह होळकर यांची मंगळवार (दि.15) रोजी सकाळी 10:00 वाजता भिगवण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जाहीर सभा होणार असल्याची माहिती महायुतीचे प्रचार प्रमुख अॅड.कृष्णाजी यादव यांनी दिली. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ अध्यक्ष महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे मार्गदर्शन करणार आहेत.तरी सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीचे प्रचारप्रमुख अॅड.यादव यांनी केले.